" उखाण्यांच्या रंगीबेरंगी दुनियेत तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे!",हळदीसाठी उखाणे नवरीसाठी उखाणे व नवरदेवासाठी उखाणे.

आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी प्रेमळ, विनोदी, पारंपरिक आणि आधुनिक उखाण्यांचा संग्रह. GROOM & BRIDE साठी उखाणे लग्नसमारंभ,मंगळागौर, साखरपुडा,बारसं,Naming Ceremony, सूनबाई-मूलगी स्पर्धा, शाळा-कॉलेज कार्यक्रम…इतर कोणताही प्रसंग असो – योग्य उखाणे इथे हिंदी आणि इंग्रजी राइमिंग ने जुळवलेले नावांसोबतचे उखाणे, जे trending topics वर आधारित असतील – मजेदार, हटके आणि आजच्या युगाशी सुसंगत इथे तुम्हाला सापडेल तोच योग्य, मनाला भावणारा आणि लक्ष वेधणारे उखाणे नक्की सापडतील!

आमचं वैशिष्ट्य

उखाण्यांच्या रंगीबेरंगी दुनियेतील नवरी

नवरीसाठी ,हळदीसाठी उखाणे best bride forever दक्षिण भारतीय लूक केली नवरी

लग्नसमारंभ,साखरपुडा इतर उखाणे नवरीसाठी उखाणे व नवरदेवासाठी उखाणे खाली सेकशन दिले आहे त्या CLICK करा

“वटपौर्णिमेला करतात वादाची पूजा
….तुझा सारखा जोडीदार भेटणार नाही दुजा”

“वटवृक्षाला प्रदक्षिणा मारते सात
देवा ….ची आयुष्यभर अशीच राहूद्या
सात”

“वटपौर्णिमेला सांगितली जाते सावित्री आणि सत्यवानाचे कथा
….. ला ऐकावी लागते रोज रोज माझी व्यथा”

“वटवृक्षाची चौफेर पसरते सावली
…..ला जन्म देणारी धन्य ती माऊली”

 

“हळदीसाठी घेतली पिवळ्या रंगाची साडी

……ला फिरायला पाहिजे चार चाकी गाडी”

हिरव्या हिरव्या साडीला जरीचे काठ”

“हिरव्या हिरव्या साडीला जरीचे काठ

….बरोबर बांधली लग्न गाठ”

“हळदीसाठी घेतली पिवळ्या रंगाची साडी

….ला खूप शोभून दिसते दाडी”

“हातात भरला बांगड्याचा हिरवा चुडा
…..बरॊबर झाला आज साखरपुडा”

“गरम गरम तेलात तळाला बटाटावडा
….चा नाव घेतो उरका लवकर साखरपुडा”

“सासूबाईंना आवडतो पार्ले बिस्कीटचा पुडा
……च नाव घेते आज आहे माझा साखरपुडा”

“साखरपुड्यात अंगठीला असतो मान
….आहे माझा जीव कि प्राण”

” शाळेत मुलांना compulsory असतो गणवेश

 …….. नाव घेऊन करते गृहप्रवेश”

“नऊवारी साडीवर शोभून दिसतो मराठमोळा साज
…..चा सोबत गृहप्रवेश करते मी आज”

” …. माझे माहेर लोक लग्नात देतात आहेर

….. नाव घेते नका ठेऊ आता आम्हाला बाहेर”

“भारत आमचा देश इथे वेगवेगळे आमचे वेश
…..नाव घेऊन करते गृहप्रवेश”

“सासू माझी प्रेमळ नणंद माझी हौशी

….नाव घेते सत्यनारायण पूजेचा दिवशी”

“सकाळी सकाळी सूर्याचे पडतात कवळे किरण
….नाव घेतो /घेत सत्यनारायणाच्या पूजेचे कारण”

“सत्यनारायण पूजेत ऐकवली जाते सत्यरायणाची कथा
….नाव घेते देवाचा चरणी ठेऊन माथा”

“सत्यनारायणाचा पूजेला ……केला व्रत
ऑफिस मध्ये डॉकमेंटचा काढायला लागतात प्रत”

उखाण्यांची गोडी आता व्हिडिओमधून!
आमच्या YouTube चॅनेलवर बघा – नवीन उखाणे, स्पर्धा,बाळाचा पाळणा,गंमतीशीर , टिप्स आणि मराठी परंपरेची मजा तुमच्या खास क्षणांना सजवण्यासाठी आमचे व्हिडिओ नक्की पहा!

 [https://www.youtube.com/channel/UCblUD3xr1FL8h0Vq8z_vdtg] ला भेट द्या आणि Subscribe करा

PRACHI
PRACHI
@Prachi23
Your Youtube Video was very useful to my sister for her wedding ukhane rituals thank u so much
ash
ash
@ash2216
उखाणे खूप छान new trending असल्यामुळे old पण new version मध्ये आहे त्यामुळे संस्कृती ,परंपरा जपल्या जात आहे .
Pooja
Pooja
@pooja18
Thank for making my wedding invitation card
rahul rajut
rahul rajut
@rj
“Ukhane ebook मी विकत घेतली. खूप मजेशीर आणि मराठमोळं कंटेंट आहे. आमच्या लग्नात सगळ्यांनी enjoy केलं.”
Scroll to Top