महाराष्ट्राच्या इतिहासात आणि समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अत्यंत आदराने आणि गौरवाने घेतले जाते. महाराज हे महाराष्ट्रच नाही तर पूर्ण विश्वाला एक आदर्श व्यक्तिमत्व ,स्वराज स्थापन करणे आमचे राजे सर्व आठरा पाघड जातील एकजुटीने घट्ट ठेवणारे आमचे महान राजे होते ,शिवजयंती, स्वराज्य दिन, किंवा कोणताही राष्ट्रीय उत्सव असो, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकले की आपल्या मनात अभिमानाची लहर उसळते. महाराज केवळ एक योद्धा नव्हते, तर ते आपले आदर्श राजा, शूरवीर आणि सर्वसामान्यांचा रक्षणकर्ता होते.
“आमचे राजे होते फार पराक्रमी
.. आयुष्यात पडु देणार नाही कशाची कमी “
शिवरायांनी जशी मराठी भाषा, पारंपरिक संस्कृती आणि सन्मान टिकवून ठेवला, तशीच आज आपणही आपली मराठी ओळख जपायला हवी. त्यावेळी महिलावर्ग उखाणे,तर पुरुषमंडळी पोवाडे, शाहिरी करत असत , हे केवळ शब्दांचे खेळ नाहीत, तर संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. व ते आपण जतन करून ठेवावे व हि परंपरा ,संस्कृती तशीच टिकवून ठेवावी या हेतूने हे उखाणे सादर करत आहे.
शिवरायांनी फक्त युद्धभूमीवरच नाही तर रयतेच्या सामान्य माणसाच्या मनातही वसलेले आहेत . म्हणूनच आजही लग्नसमारंभ, मंगलकार्य, सण-उत्सव अशा प्रसंगी महाराजांच्या नावाने ,ओव्या पोवाडे घेण्याची गाणी इत्यादी आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेत दिसून येते .
“महाराष्ट्र म्हटले आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
…नाव घेतो/घेते आजचा दिवस माझासाठी आहे खूप खास”
शिवरायांच्या मावळ्यांची आहे मी लेक,
…च नाव घेते सदैव राहिल मी नेक
“शिवनेरी गडावर जन्मले छत्रपती शिवाजी महाराज
…..नाव घेते /घेतो तुमच्यासाठी खास “
छत्रपती शिवाजी महाराजांना साथ होती मावळ्यांची
…. नावे झाली सून ….. घराण्याची
शिवनेरीच्या कुशीत जन्मला शिवबाचा अभिमान,
शिवनेरीच्या कुशीत जन्मला शिवबाचा अभिमान,
….. आहे माझा स्वाभिमान
