नवरदेवासाठी उखाणे,नवरदेव म्हणजे नेमका काय ?
नवरदेव उखाणे – खास लग्नासाठी
नवरदेव म्हणजे नेमकं काय?
लग्न म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो सजलेला मंडप, आनंदी पाहुण्यांची गर्दी, गाण्यांचा गजर आणि सर्वांच्या नजरेतला खास व्यक्ती – नवरदेव.
होय, लग्नात नवरदेव म्हणजे हिरो असतो. त्याची वेशभूषा, पेहराव, पगडी, शेरवानी किंवा धोतर-कुर्ता ही पारंपरिक किंवा मॉडर्न दोन्ही असू शकते. ज्या पद्धतीने तो परिधान करतो, त्यावरून त्याची व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसते. पाहिलं तर नवरदेव म्हणजे मुलगा, भाऊ, मित्र, आणि आता नवरा होणारा – हसरा, गोंडस आणि थोडासा लाजरा!
आजचं युग मॉडर्न असलं तरीही प्राचीन परंपरा व रितीरिवाज प्रेमाने आणि आनंदाने जोपासले जातात. लग्नातील अनेक सुंदर परंपरांपैकी एक परंपरा म्हणजे उखाणे घेणे.
पूर्वी उखाणे फक्त नवरीसाठी महत्वाचे मानले जायचे. पण आजच्या काळात नवरदेवसुद्धा उखाणे घेण्याची पद्धत जोपासतो. यामध्ये गंमतीशीर, विनोदी, समाजप्रबोधन, ऐतिहासिक तसेच आधुनिक विषयांवर आधारित म्हणी घेतले जातात.
आधुनिक सोशल मीडिया स्टाईल उखाणे:-
आजच्या काळात Instagram, YouTube, Facebook सारख्या प्लॅटफॉर्मवर उखाणे मोठ्या प्रमाणात share केले जातात.
“Instagram वर फोटो लावला Filter
… म्हणजे आहे लेडी Hitler”
नवरदेवाचे उखाणे का खास असतात?
उखाणे हा फक्त विनोदाचा भाग नाही तर नवरदेवाच्या विचारसरणीचा, त्याच्या विनोदबुद्धीचा आणि आधुनिकतेशी जुळवून घेण्याच्या वृत्तीचा परिचय देतो. नवरी-नवरदेव या क्षणाचा आनंद घेतात, मित्रमंडळी हास्याचा फवारा उडवतात आणि संपूर्ण लग्न सोहळ्याला एक वेगळीच रंगत येते.
सध्याच्या काळातले ट्रेंडिंग उखाणे
आजच्या पिढीला सोशल मीडियाचा प्रभाव जबरदस्त आहे. त्यामुळेच नवरदेवाचे उखाणे देखील आधुनिक झाले आहेत. Youtube, फेसबुक ,इंस्टाग्राम , व्हाट्सअँप,ट्विटर,अशा सोशल मीडिया अॅप्सवर आधारित Ukhane आजकाल लोकप्रिय आहेत.
“Youtube वर trending video, Instagram वर story भारी,
माझ्या नवरीचं नाव घेऊन करतो उखाणा सारी.”
“Facebook वर friend request, Insta वर follow,
माझ्या नवरीशिवाय आयुष्य नाही hollow.”
याशिवाय नवरदेव नवीन गाणी, सिनेमे, cricket matches, web series अशा trending topics वरही उखाणे रचतात. त्यामुळे पाहुण्यांमध्ये उत्सुकता वाढते आणि नवरदेवाला सगळ्यांचा दाद मिळतो.
गृहप्रवेश आणि नवरदेवाचे उखाणे
लग्नानंतरचा गृहप्रवेश हा फार भावनिक आणि आनंददायी प्रसंग असतो. परंपरेनुसार गृहप्रवेशाच्या वेळी नवरी उखाणा घेते, पण त्याचप्रमाणे नवरदेवही उखाणे घेतो. यामुळे दोघांमधील संवाद अधिक गोड होतो. नवरी-नवरदेवाच्या या छोट्याशा खेळकर कृतीमुळे कुटुंबीयही आनंद घेतात आणि घरात आनंदमय वातावरण निर्माण होते.
नवरदेवाचे उखाणे – मनोरंजनाचा ठेवा
आजच्या लग्नसमारंभात उखाणे फक्त परंपरेपुरते मर्यादित नसून ते entertainment चा भाग बनले आहेत. Stand-up comedy, मजेशीर किस्से, riddles अशा गोष्टींसोबत नवरदेवाचे उखाणे हा एक highlight ठरतो.
कधी कधी नवरदेव मित्रांसोबत मिळून group उखाणे घेतो ज्यामुळे संपूर्ण मंडप हास्याने गजबजून जातो.
नवरदेवाची भूमिका समाजप्रभोधनातही
काही नवरदेव समाजातील मुद्द्यांवर उखाण्यांद्वारे प्रकाश टाकतात. शिक्षण, पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, save water यांसारख्या विषयांवर आधारित . नवरदेव उखाणे हा एक उत्तम समाजप्रभोधनाचा मार्ग ठरतो. यामुळे नवरदेवाला टाळ्यांचा कडकडाट मिळतोच, पण त्याचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी वाटते.
लग्नामध्ये वराचे उखाणे हे फक्त परंपरेपुरते मर्यादित नसून, ते हास्य-विनोदाचे आणि आपुलकीचे क्षण निर्माण करणारे असतात. जेव्हा नवरदेव आपल्या मित्रांसोबत किंवा नवरदेवीसोबत उखाणे घेतो, तेव्हा वातावरणात एक वेगळीच मजा निर्माण होते. आजच्या सोशल मीडिया युगात बरेच जण हे उखाणे रेकॉर्ड करून reels, YouTube Shorts किंवा WhatsApp status वर share करतात. यामुळे जुनी परंपरा नव्या तंत्रज्ञानाशी जोडली गेली आहे.
तसेच, groom चे उखाणे हे कधी कधी समाजप्रबोधनाचे साधन सुद्धा ठरतात. उदा. पर्यावरण संवर्धन, शिक्षण, स्त्री–पुरुष समानता किंवा दानधर्म या विषयांवरही मजेदार उखाण्यांच्या माध्यमातून संदेश दिला जातो. त्यामुळे वर हा फक्त लग्नातील हिरो नसून, तो हास्याचा, संस्कृतीचा आणि संदेश देण्याचा एक महत्त्वाचा दुवा बन
पारंपरिक आणि ऐतिहासिक उखाणे :-जुनी परंपरा जपताना नवरदेवसाठी
छत्रपती शिवाजी महाराज, संत किंवा विधवान ,कवी ऐतिहासिक संदर्भ घेऊन उखाण्यांमध्ये येतो .
“छत्रपतींच्या गडावर फडकतो भगवा झेंडा,
…. बरोबर सुखी संसार करण हाच माझा अजेंडा. “
” पेशव्यांच्या दरबारात दुमदुमले होते ढोल,
…. माझा आयुष्यातलं आहे रत्न अनमोल.”
“तुकारामांच्या अभंगात आहे भक्तीचा गंध,
…. नी दिला आयुष्याला माझ्या आनंद.”
ट्रेंडिंग YouTube व Instagram नवरदेवासाठी उखाणे
“YouTube वर बघते/बघतो पॉडकास्
….. बराबोर झाले माझे इंटरकास्ट”
” एक नंबर तुझी कंबर चाल शेकी शेकी
……. नाव घेतो सांगा आणखी राहिलं का बाकी “
“मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज
…. नाव घेतो /घेते तुमच्या सगळ्यासाठी आज”
