भोगी सण महाराष्ट्र-मकरसंक्रांतीचा पहिला सण|Bhogi Festival 2026

🗓️ भोगी सण 2026 : -13 जानेवारी 2026

Bhogi Festival 2026 हा मकरसंक्रांतीपूर्वी एक
दिवस आधी साजरा होणारा अत्यंत महत्त्वाचा पारंपरिक सण आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू पुदुच्चेरी,ओडिशा आणि इतर राज्यांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

🌾 1️⃣ महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये भोगी या नावाने साजरा करातात या दिवशी जुनं सोडून नवं स्वीकारण्याचा सण मानला जातो जसे कि (जुन्या आठवणी, वाईट सवयी,जुन्या घरातील मोडक्या, निरुपयोगी वस्तू ,नकारात्मकता जाळण्याचा भाव ,मतभेद सोडून नवीन गोष्टी आनंदाने स्वीकारणे ) व नवीन जसे कि शेतकरी नवीन हंगामाच्या स्वागतासाठी भोगी साजरी करतात तर काही लोक नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात करतात .

भोगी चा दिवशी महाराष्ट्रामध्ये भोगीची भाजी बनवली जाते आता तुम्ही म्हणाल नक्की हि भाजी कशी असते तर या भाजीमध्ये हिवाळ्यात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते.

🥕 भोगी भाजीमध्ये काय काय असते?

गाजर,वांगी,भेंडी,मटार,शेवग,हरभरा,चवळी,मेथी,डिंगरी ,वाल पापडी, पावट्याचे दाणे (वाल), मटार, वांगी, बटाटा, बोरं वाटणासाठी :- खोबरे, गूळ, शेंगदाणे, थोडी कोथिंबीर,तिळ फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट (ऐच्छिक), गोडा मसाला आणि पाणी, मीठ इत्यादी चा वापर केला जातो किंवा तुम्ही तुमचा आवडी प्रमाणे सुद्धा घेऊ शकता .

भोगीची भाजीबाजरी / ज्वारीची भाकरी तिळाचा वापर (उष्णता देणारा)

👉 ही भाजी पोषक तत्वांनी भरलेली असते.

त्याचबरॊबर बाजरीची भाकरी करातात व त्या मध्ये तीळ टाकले जाते . आता तुम्हला प्रश्न पडला असेल बाजरी भक्ती का व त्या मध्ये तीळ का घातले असतील तर भाजी भाकरी हि गरम असते व bhogi हि हिवाळ्यात येते तर शरीराला हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी बाजरी व तीळ उष्णता देतात आणि तीळ हे पचन सुधारण्यासाठी चांगले म्हणून वापरात .

bhogi च्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मकरसंक्रती साजरा केली जाते .या दिवशी विवाहित , नवविवाहित , सौभाग्यवती महिला एकमेकींना वाण देतायत ओटी भरतात व उखाणे घेतात .त्याच बरोबर तिळगुळ पण देतात व म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा प्रकारे हळदी कूंकुवाचे पण कार्य्रक्रम नंतर एकमेकींच्या खरी त्या संक्रातीला करतात या बद्दल पण माहिती नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूच .

🌴 2️⃣ कर्नाटक:-

कर्नाटकमध्ये bhogi / bhogi habba या नावाने ओळखल्या जातो किंवा साजरा करतात .महाराष्ट्रासारखेच इथे सुद्धा bhogi ला जुनी वस्तू जाळण्याची प्रथा आहे व शेतकरी नवीन पिकांचे स्वागत कार्यांसाठी भोगी मानवतात काही भागांत याला भोगी संक्रांती असेही म्हणतात.

🌾 3️⃣ तामिळनाडू

तर तामिळनाडूनध्ये Bhogi Pongal या नावाने म्हणून या सणाची ओळख आहे .पोंगल हा bhogi सणाचा पहिला दिवस मनाला जातो .इथे चार दिवस पोंगल साजरा करतात . bhogi pongal हा पहिला दिवस या दिवशी विशेषतः जुने सोडून नवीन स्वीकारण्याचा आणि निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते .
bhogi pongal कधी साजरा केला जातो?
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सहसा 13 किंवा 14 जानेवारी साजरा केला जातो.यानंतर पुढील तीन दिवस

1)थाई पोंगल :-

🧹 1. घराची साफसफाई (House Cleansing Ritual)

  • हे नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे.
  • bhogi pongal च्या आधी आणि त्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ केले जाते.

🔥 2. भोगी मंटलू (Bhogi Mantalu) – अग्नी विधी

  • पहाटे जुनी भांडी, लाकूड, गवत, निरुपयोगी वस्तू एकत्र करून जाळतात
  • या अग्नीला “Bhogi Mantalu” म्हणतात.
  • हे कर्म जुने दुःख, आजार, अडथळे जाळून टाकण्याचा भाव दर्शवते.
  • गायी, बैल, पाळीव प्राणी यांची पुन्हा आठवण व काळजी घेतली जाते.

🌸 3. रंगोली आणि सजावट

  • घराच्या अंगणात कोलम (तमिळ रांगोळी) काढली जाते.
  • ताज्या फुलांनी आणि पानांनी घर सजवले जाते.

✨3. कानुम पोंगल

  • कानुम पोंगल हा दिवस नातेसंबंध दृढ करण्याचा आहे.
  • कामापासून थोडा विरंगुळा.
  • आनंद, सहवास आणि कुटुंबाची एकता दर्शवतो.
  • काही तमिळ कुटुंबांत बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात
    भात, फळे, गूळ, फुले ठेवून पूजा करतात.
    ⚠️ आधुनिक काळात पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक किंवा हानिकारक वस्तू जाळणे टाळले जाते.

🔹 धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

  • भोगी पोंगल हा दिवस इंद्र देवाला अर्पण केला जातो.
  • शेती, पाऊस आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
  • शेतकरी वर्गासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो.

🔹 Bhogi Pongal चा संदेश

“जुने विसरा, नवे स्वीकारा – स्वच्छ विचार, स्वच्छ घर, स्वच्छ जीवन.”

“जुने सोडून नव्याचे स्वागत”
शुद्धीकरण, आरोग्य व समृद्धीचा संदेश देणारा दिवस.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top