मकरसंक्रांत झाली की तिळगुळाबरोबरच महिलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता दिसायला लागते. ती म्हणजे हळदीकुंकू कार्यक्रमाची लगबग! घराघरांतून आमंत्रणं जातात, महिलामंडळ एकमेकींच्या घरी जाऊन हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात.

हळदीकुंकू म्हणजे फक्त ओटी भरणं नाही, तर तो एक जिव्हाळ्याचा, हसरा कार्यक्रम असतो. वाण देणं, नवीन प्रकारचे पक्वान बनवणं, साड्या, दागिने, फराळ अशा अनेक गोष्टी यात असतात. काही ठिकाणी नवरदेव-नवरीशी संबंधित वस्तू दिल्या जातात, तर कुठे छोटे खेळ, गप्पा, हास्यविनोद रंगतात.
या सगळ्यात कार्यक्रमाचा सगळ्यात खास आणि मजेशीर भाग असतो तो म्हणजे मराठी उखाणे. उखाण्यांमधून नाव घेताना होणारी लाज, टाळ्यांचा गजर आणि हशा—यामुळे संपूर्ण वातावरणच आनंदी होतं. म्हणूनच हळदीकुंकू हा केवळ एक कार्यक्रम न राहता, महिलांसाठी आपुलकीचा आणि नात्यांचा उत्सव ठरतो.