वटपौर्णिमा सत्यनारायण माहिती

वटपौर्णिमा सत्यनारायण वटसावित्रीसाठी महिलांसाठी पूजा करतात आपल्या पतीचा दीर्घ आयुष्यासाठी, सुखी वैवाहिक सुखासाठी वडाची पूजा करतात.

वटपौर्णिमा हा सण जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करतात हा आपल्या महाराष्ट्रात महिलांसाठी खूप महत्वाचा सण आहे. या दिवशी महिला मंडळ वडाची(वडाच्याझाडाची ) पूजा करतात आपल्या पतीचा दीर्घ आयुष्यासाठी, सुखी वैवाहिक सुखासाठी वडाची पूजा करतात.श्रीनारायण व्रताचं उद्धेश  म्हणजे कुटुंबात शांती, समृद्धी आणि श्रद्धेची वाढ. ज्या भावनेनं सावित्रीने आपल्या पतीसाठी उपवास केला, त्याचप्रमाणे या कथेमधूनही सत्य, प्रामाणिकपणा आणि देवभक्तीची शिकवण मिळते.

वटपौर्णिमा आणि सत्यनारायण पूजेचं महत्त्व

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला वेगळं स्थान आहे. त्यात  वटवृक्ष पूजा दिन आणि  नारायण पूजा हे दोन विशेष धार्मिक सोहळे कुटुंबाच्या एकोप्यासाठी आणि श्रद्धा वृद्धीसाठी महत्त्वाचे मानले जातात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. तर श्रीनारायण  व्रत ही प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला घराघरात केली जाणारी पूजा असून सुख, समृद्धी व आरोग्यासाठी ही परंपरा जोपासली जाते.

श्रीनारायण पूजेची तयारी आणि विधी:-

सत्यनारायण कथा ही या पूजेचं मुख्य आकर्षण आहे. पूजेच्या आधी मंडप स्वच्छ करून कलश स्थापन केला जातो. नंतर भगवान श्रीनारायणाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर पांडुरंग, लक्ष्मी, गणपती यांचीही आराधना केली जाते. घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन ही पूजा करतात. श्रद्धेने व्रत केल्याने मानसिक समाधान आणि कुटुंबात शांतता निर्माण होते, अशी मान्यता आहे.

 

स्त्रियांसाठी  वटसावित्री व्रत अतिशय पवित्र मानलं जातं. या दिवशी वडाच्या झाडाभोवती सात किंवा एकोणतीस प्रदक्षिणा घालतात. झाडाच्या मुळाशी दूध, फळं, सुगंधी वस्तू अर्पण करून पूजा केली जाते. सावित्री-सत्यवानाच्या कथेला या व्रताचं विशेष महत्त्व आहे. श्रद्धेने केलेल्या या पूजेमुळे वैवाहिक जीवन अधिक सुंदर होतं, असं मानलं जातं.मराठी संस्कृतीत प्रत्येक सणासोबत उखाण्यांची परंपरा जोडलेली आहे. श्रीनारायणा व्रत असो वा वटपौर्णिमा पूजा, नवरा-नवरी एकमेकाचं नाव घेत उखाणे म्हणतात. उखाण्यांमधून केवळ मजेशीर वातावरणच नव्हे, तर नात्यांतील गोडवा प्रकट होतो. 

“वडाच्या झाडाला केला नमस्कार, 

___ आहेत माझा आधार.”

“श्रीनारायणाच्या पूजेतील मंगल प्रसाद, 

___ सोबत करेल प्रेमाने वाद .”

 

 पूजेसाठी घर स्वच्छ करून पवित्र वातावरण तयार केलं जातं.

पूजेत लागणाऱ्या वस्तू :

  • कलश आणि नारळ

  • तांदूळ व पंचामृत

  • पान, सुपारी आणि फुले

  • भगवान श्रीनारायणाचे चित्र किंवा मूर्ती

  • पंचपल्लव, धूप, दीप व नैवेद्य

  • पंचखाद्य आणि प्रसादासाठी शिरा

पूजा करताना सर्व कुटुंबीय एकत्र बसतात. कथा ऐकून, आरती करून प्रसाद वाटला जातो. या व्रतामुळे कुटुंबात शांती आणि समृद्धी नांदते, असा विश्वास आहे.

 श्रद्धा, परंपरा आणि कुटुंबाचं बंधन:-

व्रत-पूजा केवळ धार्मिक विधी नसून त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एकत्र आणतात. वटपौर्णिमा आणि श्रीनारायण  व्रत या दोन्हींचा मुख्य उद्देश एकच – घरात शांती, आरोग्य आणि आनंद नांदावा. या पूजांनी भारतीय समाजात नाती दृढ होतात आणि संस्कारांचा वारसा पुढच्या पिढीकडे पोहोच

वटसावित्रीसाठी महिलांसाठी उखाणे

वटसावित्रीसाठी महिलांसाठी उखाणे​
“वटसावित्री करतात वडाची पूजा
….तुझा सारखा जोडीदार भेटणार नाही दुजा”

“वटवृक्षाला प्रदक्षिणा मारते सात
देवा ….ची आयुष्यभर अशीच राहूद्या
सात”

“वटसावित्री व्रतला सांगितली जाते सावित्री आणि सत्यवानाचे कथा
….. ला ऐकावी लागते रोज रोज माझी व्यथा”

“वटवृक्षाची चौफेर पसरते सावली
…..ला जन्म देणारी धन्य ती माऊली”

“सकाळी सकाळी सूर्याचे पडतात कवळे किरण
….नाव घेतो /घेत श्रीनारायणाच्या पूजेचे कारण”

“श्रीनारायण पूजेत ऐकवली जाते श्रीनारायणाची कथा

….नाव घेते देवाचा चरणी ठेऊन माथा”

“सत्यनारायणाचा पूजेला ……केला व्रत
ऑफिस मध्ये डॉकमेंटचा काढायला लागतात प्रत”

“ वटवृक्ष पौर्णिमाला करतात वडाची पूजा
….तुझा सारखा जोडीदार भेटणार नाही दुजा”

“वटवृक्षाला प्रदक्षिणा मारते सात
देवा ….ची आयुष्यभर अशीच राहूद्या
सात”

Scroll to Top