मकरसंक्रांती 2026 – कधी आहे, का साजरी करतात? वाण, तिळगूळ आणि खास उखाणे.

मकरसंक्रांती कधी आहे २०२६ची ?

2026 मध्ये संक्रांती 14 जानेवारीला आहे. संक्रांती शुभ वेळ : दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत. (कॅलेंडर तपासण्यासाठी लक्षात ठेवा) यावेळी संक्रांत बुधवारी येते. बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस मानला जातो, जो ज्ञान, संचार, व्यापार आणि समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी दान, गोड बोलणे आणि नवीन सुरुवात करणे हे शुभ मानले जाते.

मकरसंक्राती 2026 साठी विशेष माहिती :-

मकरसंक्रांती म्हणजे काय?

मकरसंक्रांती हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत शुभ सण मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. भारतात हा सण विविध नावांनी साजरा केला जातो – पंजाबमध्ये लोहडी, आसाम ,पुदुच्चेरी,आंध्रप्रदेश ,तामिळनाडू पोंगल तर महाराष्ट्रात तिळगुळ आणि उखाण्यांची परंपरा खास आहे.

संक्रांतीला काय करावे ?

सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, मग अंगण झाडून नियमित शिंपडावे, घर स्वच्छ करावे, रांगोळी काढावी. तिळगुळ तयार होईल आणि शेजारच्या लोकांना वाटेल (तिळगुळ आणि तीळ, गूळ थोडे जायफळ, विलो आणि साखर घालावी, पण बानू शटकत. तिळगुळ लाडू, गुलपत्ती वगैरे बनवा) – “तिळगुळ घ्या, गोड बोला.” गरजू लोकांना दान द्यावे आणि यावेळी संक्रांत बुधवारी येते त्यामुळे अवश्य दान करा. पतंग उडवणे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळले जाते जेथे मुले त्यांच्या पालकांसह विविध मजेदार खेळ खेळतात किंवा पतंग उडवणे ही एक शर्यत आहे.

लहान मुलांनी पतंग खेळताना दक्षता बाळगावी कारण बऱ्याच ठिकाणी मांज्या वापरतात त्या मुले पक्षांना धोका होतो बरेच पक्षांचा मृत्यू होतो काही जखमी होतात तर काही लोकांचे त्याने हात किंवा गळा कापण्याची दाट शक्यता असते म्हणून पालकांनी मुलांना मांज्याला पर्याय असलेले दोरे वापरावे व मुलाची व पर्यावनातील पक्षाची काळजी घावी .

मकरसंक्रांती काय करू नये ?

नकारात्मकता:

आपापसातील मतभेद , भांडण तंटा विसरा आणि कोणाशीही वैर भाव ठेवू नका सर्वांची आनंदाने भेटा, मैत्री करा आपुलकीने वागण्याचाच हा सण आहे .

मांस-मदिरा:

या दिवशी मांसाहार खाऊ नका व मद्यपान जसे कि (चिकन ,मटण,इत्यादी ) हव तर तुम्ही या दिवशी हा संकल्प करा मद्यपान सोडण्याच्या व मांसाहार न खाण्याचं

काळे कपडे:

काळे कपडे घालणे टाळावे, कारण ते अशुभ मानले जातात. पिवळे, नारंगी, लाल असे तेजस्वी रंग वापरु शकता.

तळलेले पदार्थ:

makarsankrati 2026 ला जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे .

👩‍🦰 मकरसंक्रांती वाणामध्ये काय देतात?

वाणावाणामध्ये कोणकोणत्या वस्तू दिल्या जातात:-

  • तिळगूळ / तिळचिकी
  • साखर, गूळ
  • हळद-कुंकू
  • काचांच्या बांगड्या
  • सुगंधी साबण / आरसा
  • लहान भांडी, वाटी,
  • विणलेली पिशवी / ओटी

मकरसंक्रती साठी लागणारे साहित्य तुम्ही ओंलीने घेऊ शकता .या साठी मी खाली लिंक दिली आहे त्या वरून तुम्ही मकरसंक्रांती ला तिळगुळ देताना चांगल्या दर्जाचा गूळ वापरणे महत्त्वाचे आहे.click here: https://amzn.to/44PgG4I haldi kumkum return gifts in bulk https://amzn.to/4jsrnjE

मकरसंक्राती ला महिलांसाठी हळदीकूंकुसाठी नवीन उखाणे :-

“तिळगुळ बनवताना तिळाला मिळते गुळाची गोडी
…..रावांनी संक्रातीला गिफ्ट दिली नऊवारी साडी .”

“संक्रातीला सुवासिनींना वाण देते झाकून,
….रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून .”

“लग्नानंतरची आहे माझी पहिली संक्रांत ,
वाण देताना ….रावांच्या पुह्ना पडले मी प्रेमात .”

“पतंग उडवायला लागते मांज्याची साथ,
माझ्या सुखी आयुष्याला …. रावांची साथ.”

” नवीन वर्षाचा पहिला मराठी सण आहे मकरसंक्रात ,
पहिल्या क्षणी ….. च्या पडले मी प्रेमात .”

makarsankrathi 2026 साठी आणखी काही उखाणे:-

“तिळगुळ देताना सर्व बोलतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला ,
…. नाव घेतलं आता पटकन मला सोडा कारण बाहेर उभी आहे ओला .

“नऊवारी साडीवर केसात माळला गजरा,
… नाव घेते करू हळदी कूंकुवाचा कार्यक्रम साजरा .”

“तिळगुळाच्या गोडीत गुंफली नात्याची शान,
मकरसंक्राती निमित्त …. च नाव घायचा मिळाला मान.”

“इंग्लिशमध्ये गुळाला म्हणतात jaggery ,
….रावांना आवडते strawberry “

“तिळाला इंग्लिशमध्ये म्हणतात Sesame ,
…. लग्नाआधी घालायचे खूप kasame .”

“हळदी कूंकुवात सुहासिनीला देते वाण ,
…… च नाव घेते सर्वांचा ठेऊन मान .”

मकरसंक्रातीनंतर १ ते ५ वर्षाच्या मुलांची बोरन्हाण करतात

मकरसंक्राती नंतर १ ते ५ वर्षाच्या मुलांची बोरन्हाण करतात .बोरन्हाण साजरा करण्याचा कालावधी हा संक्रातीपासून तर रथसप्तमीपर्यंत केव्हाही करता येतो .

बोरन्हाण म्हणजे काय नेमकी कशी असते?

मकरसंक्रातीनंतर १ ते ५ वर्षाच्या मुलांची बोरन्हाण करतात .बोरन्हाण साजरा करण्याचा कालावधी हा संक्रातीपासून तर रथसप्तमीपर्यंत केव्हाही करता येतो ..बोरन्हाणमध्ये जमिनीवर स्वच्छता चटई अंथरली जाते मुलाला किंवा मुलीला छान नवीन काळ्या रंगाचा पोशाख घातल्या जातो आता तुम्ही म्हणाल कला रंग का तर रंग थंडीपासून संरक्षण देतो असे मानतात व हलव्याचे दागिने घालतात.बोरन्हाणमध्ये बोरं, शेंगा , ,उसाचे बारीक तुकडे इत्यादी हंगामी फळे पदार्थ ,मुरमुरे ,चॉकलेटे बाळाच्या डोक्यावर ओततात त्यालाच बोरलुट म्हणतात .

बोरन्हाण का साजरी करतात ?

थंडीत येणारी हंगामी फळे जसे कि बोरं, ऊस, शेंगदाणे यांसारखी फळे आणि पदार्थ मुलांना खाऊ घालणे, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि ते आजारी पडणार नाहीत व त्यांना फळाची ओळख व्हावी व आरोग्यासाठी फायदा व्हावा .

परंपरेनुसार हा लहान मुलाचा कौतुक सोहळाच म्हणता येईल .थंडीत येणारी हंगामी फळे जसे कि बोरं, ऊस, शेंगदाणे यांसारखी फळे आणि पदार्थ मुलांना खाऊ घालणे, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि ते आजारी पडणार नाहीत व त्यांना फळाची ओळख व्हावी व आरोग्यासाठी फायदा व्हावा .
परंपरेनुसार हा लहान मुलाचा कौतुक सोहळाच म्हणता येईल .या मुले आताच्या पिढीला नैसर्गिक गोष्टीची माहित कळेल शिवाय मोबाइलला पासून थोडा दूर राहतील .

बोरलुट मध्ये आलेले लहान मुलं ते जमिनीवर पडलेले बोरं, शेंगा , मुरमुरे ,उसाचे बारीक तुकडे उचलतात म्हणजेच लुटतात .

अशाप्रकारे मकरसंक्राती नंतर वेगेवेगळे कार्यक्रम हळदीकुंकू , पतंग उडवणे ,बोरन्हाण मानवतात .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top